उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एका गावातुन दुसऱ्या गावातून फिरणं म्हणजे आम्हाला काही नवीन नव्हतं. तर ते आमचं रोजचंच झालं होतं. असंच एक दिवस फिरत फिरत एका पांडववाडी गावामध्ये गेलो. गाव तसं छोटसं होतं. पण डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे आणि त्या गावातील एका जुन्या वाड्या मुळे त्या गावाची वेगळीच ठेवण दिसत होती. तो वाडा राज घराण्यातील पाच भावंडांचा होता. तो वाडा एका बाजूने पडलेला होता जरी तो पडलेला असला तरी तो वाडा आमचे लक्ष वेधून आकर्षित करत होता. त्या वाड्याबद्दल आम्ही एका मुलाला विचारले असता त्याने सांगितले की हा वाडा खूप पूर्वीचा आहे. जो अनेक दशकांपासून पडून होता. रात्री तेथे विचित्र आवाज ऐकू येत असल्याचे त्याने सांगितले. तेवढ्यातच पुढे गेल्यावर हॉटेल जवळ झाडाखाली पाणी प्यायला म्हणून थांबलो. झाडाच्या पाऱ्यावरती एक आजोबा बसलेले होते. त्यांना त्या वाड्याबद्दल विचारले तर ते म्हणाले की हा वाडा एकेकाळी राजघराण्याचा होता, गावातील लोक म्हणायचे की त्या वाड्यात कुणालातरी मारण्यात आलं आणि त्याचं आत्मा तिथे भटकतो. वाड्यात येणारा प्रत्येकजण त्या शापाचा बळी ठरतो. त्यामुळे आता तो ओसाड आणि भीतीदाय...
(ही कथा काल्पनिक असून या कथेचा कुठल्याही गोष्टींशी संबंध लावू नये ही नम्र विनंती. ) नमस्कार मित्रांनो ही घटना माझ्यासोबत गेल्या सीझनला म्हणजेच दीड वर्षांपूर्वी घडलेली आहे. त्यावेळी नुकताच उसाचा कारखाना चालू झाला होता. ट्रॅक्टर वर माझ्या गावातील एक होतकरू नवीन मुलगा ड्रायव्हर म्हणून ठेवला. मग मी माझी बाकीची कामं आणि ऊसतोड कामगारांवर लक्ष देऊ लागलो. सगळे ऊसतोड कामगार कामाला लागले. सगळं सुरळीत चालू झालं होतं. पण दहा - पंधरा दिवसातच ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर काही कारणास्तव काम सोडून गावी निघून गेला. दुसरा ड्रायव्हर मिळत नसल्यामुळे मी स्वतःच माझ्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर बनलो. ऊस तोडीच्या धंद्यात मी पण नवीनच उतरलो होतो. त्यामुळे मी आजूबाजुच्या बाकीच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर सोबत ओळख करून घेतली. कारण कारखान्यावरती येता जाताना त्यांच्या शिवाय दुसरं कोणीच माझ्यासाठी सोबतीचं नव्हतं. मी त्यांच्या सोबतच कारखान्यावर ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागलो. पण महिन्याभरातच माझ्यासोबत अशी घटना घडली. ज्या घटनेची मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. त्या घटनेने मला हादरवून सोडले. त्या दिवशी पहाटेच मी खेप खाली करून कारखान्...