अकरावीचे प्रथम सत्र परीक्षेचे पेपर संपले आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या दिवाळीच्या सुट्ट्या तश्या फक्त आठ ते दहा दिवस होत्या नंतर जादा तास चालू झाले एके दिवशी ज्यादा तासांमध्ये ऐतिहासिक ठिकाणांचा विषय निघाला. त्यावेळी अकलूजच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी एक छोटीशी सहल काढली. अकलूज मध्ये सयाजी राजे पार्क, श्री गणेश मंदिर व इतरही बरीच ऐतिहासिक ठिकाण आहेत. पण त्यातली आम्ही दोन - तीन ठिकाणी फिरलो. पण त्यातलं सर्वात जास्त प्रेक्षणीय व मनाला शांती भेटणारे ठिकाण जर म्हटलं गेलं तर शिवसृष्टी किल्ला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या कारकीर्तीतील बऱ्याच प्रसंगांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे शिवसृष्टी किल्ल्यावरचा अनुभव सांगण्या अगोदर आपण या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊयात शिवसृष्टी ( भुईकोट ) किल्ला शिवसृष्टी म्हणजे शिवरायांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित चित्रांचे व शिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन अशा शिवसृष्टी महाराष्ट्रात अनेक आहेत पण त्यात अकलूजची शिवसृष्टी प्रेक्षकांना जरा जास्तच आकर्षित करते ही शिवसृष्टी पुणे स...
मराठी कथा | Marathi Katha, Marathi story hub, Marathi story