मुख्य सामग्रीवर वगळा

शिवसृष्टी ( भुईकोट ) किल्ला

     अकरावीचे प्रथम सत्र परीक्षेचे पेपर संपले आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या दिवाळीच्या सुट्ट्या तश्या फक्त आठ ते दहा दिवस होत्या नंतर जादा तास चालू झाले एके दिवशी ज्यादा तासांमध्ये ऐतिहासिक ठिकाणांचा विषय निघाला. त्यावेळी अकलूजच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी एक छोटीशी सहल काढली. अकलूज मध्ये सयाजी राजे पार्क, श्री गणेश मंदिर व इतरही बरीच ऐतिहासिक ठिकाण आहेत. पण त्यातली आम्ही दोन - तीन ठिकाणी फिरलो. पण त्यातलं सर्वात जास्त प्रेक्षणीय व मनाला शांती भेटणारे ठिकाण जर म्हटलं गेलं तर शिवसृष्टी किल्ला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या कारकीर्तीतील बऱ्याच प्रसंगांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे 

     शिवसृष्टी किल्ल्यावरचा अनुभव सांगण्या अगोदर आपण या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊयात


शिवसृष्टी ( भुईकोट ) किल्ला

     शिवसृष्टी म्हणजे शिवरायांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित चित्रांचे व शिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन अशा शिवसृष्टी महाराष्ट्रात अनेक आहेत पण त्यात अकलूजची शिवसृष्टी प्रेक्षकांना जरा जास्तच आकर्षित करते ही शिवसृष्टी पुणे सोलापूर च्या मधोमध सोलापूर पुणे महामार्गावर सोलापूर पासून 118 किलोमीटर तर पुणे पासून 167 किलोमीटर वर असलेले अकलूज हे पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे शिवसृष्टी, वॉटर पार्क आणि धार्मिक शांतीसाठी आपला देवी मंदिर व गणेश मंदिर पर्यटकांच्या समाधानात भर टाकते. या ऐतिहासिक स्थळांमुळे अकलूज ची ओळख आता पर्यटन स्थळ म्हणून झाली आहे. नीरा नदीच्या काठावर वसलेला शिवसृष्टी किल्ला उभा आहे. या किल्ल्याला भुईकोट किल्ला असेही ओळखले जाते. या किल्ल्याची उंची सुमारे 1598 फुट इतकी आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी म्युरल्स व पुतळे यांच्या सहाय्याने या किल्ल्यात शिवसृष्टी निर्माण केली आहे. मोहिते पाटील परिवाराने गडाच्या जीर्णोद्वारासाठी व शिवसृष्टीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत

     पूर्वीच्या काळी संभाजी महाराज व इतर २६ जणांना मुकर्रब खानने संगमेश्वर येथून पकडून याच किल्ल्यावर आणले होते.

आम्ही तेथे गेलो तर कुठल्याच ऐतिहासिक ठिकाणाला एवढी गर्दी पाहिली नाही तेवढी गर्दी तेथे पाहिली पण सगळे एकदम शांत चित्ताने शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील टिपलेले प्रसंग एकदम एकटक असे पाहत होते. किल्ल्याजवळ पोहोचल्या नंतर आम्हाला किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नगाराखाना असून त्यात विविध वाद्यांचे पुतळे बसवलेले दिसले आम्ही तिकीट काढून किल्ल्यात गेल्यानंतर प्रथम फायबरच्या हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे जणू आपले स्वागत करतात असे वाटत होते. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूने चालत गेलो तर किल्ल्याच्या तटबंदीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित फायबरचीमु र्ती पाहायला मिळतात. यातील सुरुवातीच्या तीन मुर्ती शिवजन्माच्या संबंधित आहेत. त्यानंतर आपल्याला तेथे शिवनेरीवरील शिवजन्म स्थानाच्या महालाची प्रतिकृती बनवलेली असून त्यात शिवाजी महाराजांच्या बारशाचा देखावा उभा केलेला पहायला मिळतो. त्यानंतर तेथे शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या घटना मूर्तीच्या स्वरूपात दाखवल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्या बाजूला प्रसंगाची माहिती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्या मुर्तीं मधील बारकावे, व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हावभाव, आवेश यांच्याकडे पाहिले तर पाहतच राहावे असे रेखीव आहेत. शेवटी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा देखील तेथे मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मूर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, चेहऱ्यावरील भाव, डोळे या गोष्टी देखील पाहण्यासारखे आहे.


     किल्ल्याच्या मधोमध असणाऱ्या उभ्या बुरुजावर छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे आपण जर जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या आजूबाजूला पाहिले तर आपल्याला तेथील परिसराचे विहंगम दृष्य पाहता येते त्याचबरोबर बुरुजाचे एका बाजूला दोर लावून बुरुज चढणारे मावळे देखील आपल्याला पाहायला भेटतात. तसेच दुसऱ्या बाजूला शेकोटी पेटवून तेथे पहाऱ्यावरती बसलेले मावळे देखील आपल्याला पाहायला भेटतात.

     किल्ल्याच्या तटावर जर पाहिले तर तेथे विविध जाती धर्मांचे मावळे आपल्याला पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले दिसतील यात तोफची, मशालची, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी, इ.चा समावेश केला गेलेला आहे हे पुतळे पाहत आम्ही किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरून नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्रहालयात आलो या संग्रहालसमोरच हत्तीवरून दवंडी देणाऱ्या माळव्यांचा पुतळा उभारला गेला आहे संग्रहालयात महत्त्वाच्या किल्ल्यांच्या फायबर मधील प्रतिकृती बनविल्या आहेत. त्यात राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, प्रतापगड, देवगिरी, या किल्ल्यांचा समावेश केला आहे. 


     किल्ल्यात ठिकठिकाणी फुलझाडे हिरवळ व कारंजे आहेत. त्यामुळे किल्ल्याचा फेरफटका अगदी नेत्र सुखत होतो. किल्ल्यातून बाहेर पडल्यानंतर नदीकाठाने बुरुजाला लागून असलेले वाटेने गेल्यास तटबंदीतील हिरवळ व इतर पुरातन अवशेष देखील आपल्याला पाहायला भेटतात.

     किल्ल्याची स्वच्छता, किल्ल्याचा रेखीवपणा तेथील बुरुज व म्युरल्स या सगळ्यांकडे पाहिलं तर मन प्रसन्न होऊन जाते

     खरंच या किल्ल्यावर ऐतिहासिक वारसा जपला गेला आहे. माझ्या माहिती प्रमाणे हा पहिलाच किल्ला असेल जिथे ऐतिहासिक गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे येणाऱ्या पिढ्यांना त्यांचा सुवर्ण इतिहास आठवण्यासाठी आणि द ग्रेट शिवाजी राजे सयाजी राजे भोसले यांनी मराठा साम्राज्य कसे स्थापन केले हे जाणून घेण्यासाठी हे ठिकाण खरोखरच उपयुक्त आहे. प्रत्येक स्वाभिमानी भारतीय आणि तसेच परदेशी यांनी या आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी नक्की भेट द्यायला हवी.


धन्यवाद...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक स्वप्न असंही - भयकथा

नमस्कार मित्रांनो मी किरण मी तुम्हाला मला पडलेला भयानक स्वप्नाचं वर्णन थोडक्यात सांगत आहे. हे स्वप्न मला साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी पडलं होतं पण अजूनही ते स्वप्न आठवलं तर अंगावरती काटा येतो. मित्रांनो मी शेतातलं दिवस भराचं काम संपवून घरी आलो. घरचं थोडं काम उरकून घेतले आईने केलेली गरमा - गरम भाजी - भाकरी खाल्ली आणि अंथरुनावर आडवा झालो. त्या दिवशी दिवसभर राबल्यामुळे झोप लगेचच लागली. शरीरात थकवा होता, आणि डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे झोप पण लगेच लागली. परंतु, झोपल्यावर काही मिनिटांतच एक विचित्र स्वप्न पाहायला सुरुवात झाली, आणि माझ्या शांत झोपेची वाट लागली. त्या स्वप्नात मी माझ्या गाडीवर प्रवास करत होतो. रस्ता ओसाड होता. आजूबाजूला घनदाट जंगल होते. मावळतीचे रंग आसमंतात पसरले होते. आणि थोडं पावसाचे वातावरण झाले होते. मी माझ्या विचारांच्या गर्दीत गाडी चालवत होतो. कुठेही मानव वस्तीचा मागमुस नव्हता. रस्ता ही ओळखीचा वाटत नव्हता. तरी मी पुढे चाललो होतो. आणि त्यातच एकाएकी मला समोर दिसले की कोणीतरी लिफ्ट साठी हात पुढे करत आहे. मी गाडी थांबवली. पण गाडीचा स्पीड जास्त असल्यामुळे गाडी थोड...

अनोळखी रस्ता- भयकथा

(ही कथा काल्पनिक असून या कथेचा कुठल्याही गोष्टींशी संबंध लावू नये ही नम्र विनंती. ) नमस्कार मित्रांनो ही घटना माझ्यासोबत गेल्या सीझनला म्हणजेच दीड वर्षांपूर्वी घडलेली आहे. त्यावेळी नुकताच उसाचा कारखाना चालू झाला होता. ट्रॅक्टर वर माझ्या गावातील एक होतकरू नवीन मुलगा ड्रायव्हर म्हणून ठेवला. मग मी माझी बाकीची कामं आणि ऊसतोड कामगारांवर लक्ष देऊ लागलो. सगळे ऊसतोड कामगार कामाला लागले. सगळं सुरळीत चालू झालं होतं. पण दहा - पंधरा दिवसातच ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर काही कारणास्तव काम सोडून गावी निघून गेला. दुसरा ड्रायव्हर मिळत नसल्यामुळे मी स्वतःच माझ्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर बनलो.  ऊस तोडीच्या धंद्यात मी पण नवीनच उतरलो होतो. त्यामुळे मी आजूबाजुच्या बाकीच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर सोबत ओळख करून घेतली. कारण कारखान्यावरती येता जाताना त्यांच्या शिवाय दुसरं कोणीच माझ्यासाठी सोबतीचं नव्हतं. मी त्यांच्या सोबतच कारखान्यावर ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागलो. पण महिन्याभरातच माझ्यासोबत अशी घटना घडली. ज्या घटनेची मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. त्या घटनेने मला हादरवून सोडले. त्या दिवशी पहाटेच मी खेप खाली करून कारखान्...

हा खेळ सावल्यांचा- भयकथा

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एका गावातुन दुसऱ्या गावातून फिरणं म्हणजे आम्हाला काही नवीन नव्हतं. तर ते आमचं रोजचंच झालं होतं. असंच एक दिवस फिरत फिरत एका पांडववाडी गावामध्ये गेलो. गाव तसं छोटसं होतं. पण डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे आणि त्या गावातील एका जुन्या वाड्या मुळे त्या गावाची वेगळीच ठेवण दिसत होती. तो वाडा राज घराण्यातील पाच भावंडांचा होता. तो वाडा एका बाजूने पडलेला होता जरी तो पडलेला असला तरी तो वाडा आमचे लक्ष वेधून आकर्षित करत होता. त्या वाड्याबद्दल आम्ही एका मुलाला विचारले असता त्याने सांगितले की हा वाडा खूप पूर्वीचा आहे. जो अनेक दशकांपासून पडून होता. रात्री तेथे विचित्र आवाज ऐकू येत असल्याचे त्याने सांगितले.  तेवढ्यातच पुढे गेल्यावर हॉटेल जवळ झाडाखाली पाणी प्यायला म्हणून थांबलो. झाडाच्या पाऱ्यावरती एक आजोबा बसलेले होते. त्यांना त्या वाड्याबद्दल विचारले तर ते म्हणाले की हा वाडा एकेकाळी राजघराण्याचा होता, गावातील लोक म्हणायचे की त्या वाड्यात कुणालातरी मारण्यात आलं आणि त्याचं आत्मा तिथे भटकतो. वाड्यात येणारा प्रत्येकजण त्या शापाचा बळी ठरतो. त्यामुळे आता तो ओसाड आणि भीतीदाय...