जीवधन किल्ला ( Jivadhan Port )
नाणेघाटा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग जुन्नर ते कोकण यांना जोडणारा हा घाट या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले त्यापैकी एक नाणेघाटाचा पाठीराखा म्हणजेच जीवदानी किल्ला या या किल्ल्याची माहिती आपण मराठी स्टोरी हब याच्या मार्फत घेणार आहोत
किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास ( history of the port )
हडसर किल्ला, ज्याला पेमगिरी किल्ला देखील म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी, १७ जून १६६३ रोजी, निजामशाही अस्ताला जात होती. त्यावेळी शहाजीराजांनी या संधीचा फायदा घेतला आणि निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तिजा निजाम याला जीवधन गडावरील कैदेतून सोडवले. त्याला संगमनेर जवळील हडसर किल्ल्यावर (पेमगिरी) घेऊन गेले आणि त्याला निजामशहा म्हणून घोषित केले. यानंतर, शहाजीराजे स्वतः वजीर बनले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. किल्ल्याचा दरवाजा, गोरक्षगडाच्या दरवाज्याप्रमाणेच, कातळात कोरलेला आहे.
आपण किल्ल्यावर कसे जाऊ शकतो ? ( How can we go to the fort? )
किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही पुणे येथून येणार असाल तर जुन्नर तालुक्यामधील घाटघर पासून आपण ट्रेक करू शकतो. घाटघर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. पुणे ते जुन्नर आणि जुन्नर ते घाटघर हा प्रवास तुम्ही एसटीने करू शकता. याच्या व्यतिरिक्त वैशाखरे या गावातून नाणेघाट ट्रॅक करून मग तुम्ही जीवधन किल्ल्याला जाऊ शकता.
जीवधन किल्ल्यावर जाणारा मार्ग ( Route to Jeevdhan Fort )
या गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. दोन्ही वाटासाठी घाटघर इथून मार्ग आहे. हा ट्रेक थोडा सोपा तर थोडा अवघड अशा पद्धतीचा आहे. या गडावर जाण्यासाठी आपल्याला दीड ते दोन तास लागतात या किल्ल्याची उंची जवळपास 3757 फुट इतकी आहे.
पहिला मार्ग म्हणजे घाटघर येथून कल्याण दरवाजा मार्गे. हा मार्ग सुरुवातीला घनदाट जंगलातून जातो त्यानंतर मात्र तुमच्या करणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग आहे या मार्गाच्या पायऱ्या तुटलेले आहेत पण रेलिंग असल्याने तेथून जाण्यास सुरक्षित वाटते. या पायरी आपल्याला थेट कल्याण दरवाजा पर्यंत घेऊन जातात. पण शेवटी दरवाजा जवळ चढून जाण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते
दुसरा मार्ग म्हणजे घाडघर पासून किल्ल्याला थोडा वळसा घालून जुन्नर दरवाजा मार्गे पण या दरवाजाची पूर्णपणे पडझड झालेले आहे त्यामुळे फार कमी पर्यटक या मार्गाचा वापर करतात.
गडावर पाहण्यासारखी ठिकाणे ( Places to see in the fort )
भक्कम आणि सुस्थितीत असलेला कल्याण दरवाजा, पडझड झालेला जुन्नर दरवाजा, तेथील गुहा, धान्य कोठार, पाण्याच्या टाक्या, बालेकिल्ला, येथील शिवाई देवीचे मंदिर, मनात धडके भरवणारा वानरलिंगी सुळका तसेच गडावरून नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसइचे छोटेसे धरण आणि माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते यांचे मनोरंजक दृश्ये दिसतात. या व्यतिरिक्त अजूनही भरपूर पाहण्यासारखे ठिकाणे येथे आहेत.
जर तुम्ही पावसाळ्यात गेला तर तुम्हाला येथे वातावरण काही वेगळेच पाहायला मिळेल त्यात नाणेघाट जवळ रिव्हर्स धबधबा सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले आहे त्यामुळे पावसाळ्यात या किल्ल्याच्या परिसरात पर्यटकांची भरपूर गर्दी असते ज्यामुळे स्थानिकांनाही त्याचा फायदा होतो. तीथे राहण्याची व खाण्याची सर्व सोयी स्थानिकाद्वारे येथे उपलब्ध केलेल्या आहेत.
वानरलिंगी सुळका म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील पर्यटकांसाठी एक आव्हाहनच आहे. त्यामुळे अधून मधून रॉक क्लाइंबिंगचा, थरार येथे आपल्याला पाहायला मिळेल.
या ठिकाणावरील अन्य पर्यटन स्थळे ( Other tourist attractions in this place )
या ठिकाणी आजूबाजूच्या भागात जर पाहिले तर बरेच किल्ले, ट्रेकिंग पॉईंट, पर्यटन स्थळे आहेत. जुन्नर भागात रेंज ट्रॅक करायचा विचार करत असाल तर चावंड किल्ला, नाणेघाट, जीवधन किल्ला निमगिरी व हनुमंतगड, हडसर किल्ला, शिवनेरी किल्ला असे बरेच पर्याय आपल्याकडे आहेत. जर आपल्याला वेळ असेल तर अन्य काही पर्यटन स्थळे जसे की साऊंड किल्ल्या जवळील कुकडेश्वर मंदिर माणिक डोह धरणाचा विस्तीर्ण जलाशय, जुन्नर भागातील लेणीसमूह इत्यादी ठिकाणांना देखील आपण भेट देऊ शकता.
तुम्ही जर या ठिकाणी ट्रेकला जायचा विचार करत असाल तर माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही एकट्याने हा ट्रेक न करता एकतर ग्रुप सोबत हा ट्रेक करावा किंवा या ठिकाणावरील संपूर्ण माहिती असणारा सोबती घेऊन हा ट्रेक करावा ते तुमच्या सोयीचे ठरेल
धन्यवाद...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा